केज येथे 92 वर्षाच्या आजीने मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाले आहे मतदान सर्वात श्रेष्ठ दान आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की केज येथील पत्रकार सतीश केजकर यांच्या मातोश्री सुमनबाई व्यंकटराव केजकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी पुण्याहून येऊन केज येथे मतदानाचा हक्क बजावला आहे मतदान सर्वात श्रेष्ठ दान आहे असे त्यांनी सांगितले खर पाहिलं तर त्यांना या वयात घरी पण मतदानाची सोय केली होती परंतु त्यांनी घरी मतदान न करता मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे ठरवले त्या पुण्याहुन खास मतदानासाठी केज येथे आल्या होत्या ‌. त्यांनी यावेळी आपले मत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आवाहन या वेळी केले

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *