वंचित बहुजन आघाडी चा अपक्ष उमेदवार डॉ महावीर सोनवणे यांना जाहीर पाठिबा

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून डॉ. महावीर सोनवणे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या स्वाक्षरीचे पाठिंबाचे पत्र बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्याकडे देण्यात आले सदर पाठिंब्याचे पत्र हे शैलेश कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ. महावीर सोनवणे यांना जाहीर पाठिंबा देऊन पुरस्कृत उमेदवार जाहीर करून पाठिंब्याचे पत्र त्यांना दिले आहे.

यावेळी बीड पूर्वचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केज मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सोनवणे यांना मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले ते दि 18 /11/2024 रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *