.पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ जवळबन येथे महाविकास आघाडीची जाहीर प्रचार सभा
केज! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असुन महाविकास आघाडी ने प्रचारात आगेकूच केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारात महाविकास आघाडी तील सर्व नेते कामाला लागले असुन शिवसेना (उबाठा) ,राष्ट्रीय काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाबरोबरच जनविकास परिवर्तन आघाडी ,शेतकरी क्रांती मोर्चा संघटना पूर्ण ताकदीने प्रचारार्थ मैदानात उतरली आहे.पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ जवळबन ता. केज येथे दि.14 नोव्हेंबर 2024 वार गुरुवारी सायंकाळी 7 वाजता खा.बजरंग सोनवणे यांच्या जाहीर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी केज च्या माजी आ.प्रा.संगीता ठोंबरे ,बीड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमीटीचे जिल्हाध्यक्ष राहूल सोनवणे, शिवसेना (उबाठा )बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे ,केज नगरपंचायत चे नगराध्यक्ष सीता ताई बनसोड ,जनविकास आघाडीचे हारूनभाई इनामदार ,शेतकरी क्रांती मोर्चा संघटनेचे अध्यक्ष कुलदीप करपे ,डॉ. अंजली घाडगे ,सुरेश तात्या पाटिल राष्ट्रीय काँग्रेस चे केज तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या जाहीर सभेला उपस्थित नागरिकांनी, मतदारांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी क्रांति मोर्चा संघटनेचे केज तालुकाध्यक्ष अतुल गवळी ,शरद इंगळे ,फिरोज भाई पठाण ,सुग्रीव करपे ,प्रमोद पांचाळ यांनी केले आहे.
