मंत्री नितीनजी गडकरी यांनी नमिताताई मुंदडा यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले

केज! प्रतिनिधी

२३२ केज विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब आणि लोकनेत्या आमदार मा.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची संयुक्त जाहीर सभा श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह मैदान अंबाजोगाई, बीड येथे पार पडली.
या सभेला अंबाजोगाईकरांसह केज विधानसभेतील मतदार बंधू-भगिनींनी अभूतपूर्व गर्दी करून उदंड प्रतिसाद दिला.
यावेळी मा.नितीनजींनी आणि मा.पंकजाताईंनी महायुती उमेदवार म्हणून मला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. गेल्या ०५ वर्षांत केज विधानसभेतील विकासकामांच्या मेरिटवर मतदान करण्याचे आवाहन दोन्ही सन्मानीय नेतेमंडळींनी केले.
याप्रसंगी केज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,मतदार बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *