दो

डंके की चोट पे मी निवडुन येणार , रमेश तात्या गालफाडे

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज केज तालुक्यातील साळेगाव येथून करण्यात आला.
साळेगाव येथील हनुमान मंदिर, संत भगवान बाबा मंदिर येथे नारळ फोडून व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, पीर बाबा दर्गा येथे चादर चडवून प्रचाराला सुरुवात केली.
20 नोव्हेंबर ला रेल्वे इंजिन ला मतदान करून रमेश तात्या गालफाडे यांना विधासभेत पाठवून इतिहास रचण्याचे आव्हान केज विधानसभा मतदारसंघातील उपस्थित नागरिकांना केले. यावेळी उपस्थित मतदारांना संबोधित करताना रमेश तात्या गालफाडे म्हणाले की मी डंके की चोट पे निवडुन येणार आणि केज, अंबाजोगाई,नेकनुर मतदार संघाचा विकास करून दाखवतो गेल्या अनेक वर्षांपासून एक हाती सत्ता असताना मतदार संघाचा काय विकास झाला मला संधी द्या मी संधीच सोन करून दाखवतो आशी भावनीक साद‌ उपस्थित मतदारांना घातली यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, तालुका अध्यक्ष कल्याण केदार,व ईतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *