मातृत्व आणि दातृत्व यांची सांगड घालणारी हिरकणी पुन्हा निवडून देऊ – प्रकाश भांडवलकर

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ नमिताताई मुंदडा यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. गावागावात जाऊन मतदारांच्या काठी भेटी घेऊन जनतेचा आशीर्वाद घेत आहेत . प्रत्यक्ष नमिताताई ला पाहुन महीला च्या डोळ्यात अश्रू येत आहेत . मतदानाच्या माध्यमातून आशीर्वादाची ओवाळणी माझ्या पदरात टाका व मला तुमची अविरत सेवा करण्याची संधी दया.आ नमिताताई मुंदडा यांच्या बाबतीत मतदार संवेदनशील आहे. त्यातच राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहिण आसल, किंवा वयोश्री योजना असल , वयोवृद्धासाठी तिर्थक्षेत्र असल या योजना गावोगावी प्रभावी अंमलबजावणी केली आहे. केज मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वतःच लहान बाळ छातीला लावुन मतदारसंघाच्या विकासासाठी त्या विधान‌ भवनात गेल्या आणि केज मतदार संघा साठी विकासाची गंगा आणली या मातृत्व आणि दातृत्व यांची सांगड घालणारी हिरकणी पुन्हा निवडून देऊ आसे युवा नेते तथा मुंदडा समर्थक प्रकाश भांडवलकर यांनी बोलताना सांगितले

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *