हरुण भाई इनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोडे यांच्या निर्णयाने कोणाचे पारडे होणार जड 

केज! प्रतिनिधी

सध्या केज विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.परंतु केज तालुक्यातील डाॅशिंग नेते म्हणून सर्व परीचीत आसलेले जनविकास परीवर्तन आघाडी चे नेते हरुण भाई इनामदार यांनी मात्र अद्याप भुमिका स्पष्ट केलेली नाही. हरुण भाई इनामदार यांनी नगराध्यक्षा सिताताई बनसोडे यांना आमदार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संपर्कात राहून तिकीट फायनल होण्याची आपेक्षा आसताना अचानक मनोज दादा जरांगे पाटील यांनी निर्णय बदलला आणि हरुण भाई यांनी सिताताई बनसोडे यांना आमदार करणयाचे स्वप्न भंगले, परंतु आता हरुण भाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोडे काय भुमिका घेणार ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. परंतु केज विधानसभा मतदारसंघात हरुण भाई इनामदार यांना मानणारा मोठा वर्ग आहे . त्यांची ज्या उमेदवारांला साथ देतील तो निक्कीच निवडुन येणार. मंग हरुण भाई इनामदार हे साथ नक्की कोणाला देणार केज शहरात दोनशे कोटीचे काम दिले म्हणुन महायुतीच्या उमेदवार सौ निमीताताई मुंदडा यांना का? एके काळी केज पंचायत समिती दोघांनी सोबत लढवलेले तथा जिवलग मित्र बीड जिल्हाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे ज्या पक्षात आहेत त्या महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा देणार ते उद्या पत्रकार परिषदेत कळेल

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *