रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराची सुरुवात उद्या साळेगाव येथुन होणार
केज! प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या जन्म गावापासुन सर्व देव देवतांचे तसेच महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे. या वेळी केज मतदार संघातील , विविध गावांतील मतदार, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता साळेगाव येथुन रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे.तरी पंचक्रोशीतील रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रेम करणार्या सुजाण मतदार बंधु भगिनी उपस्थित रहावे असे आवाहन या वेळी आयोजकांनी केले आहे
