रमेश तात्या गालफाडे यांची गेल्या पाच वर्षात केलेली समाजसेवा कामी येणार
केज! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघात सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कंबर कसून रमेश तात्या गालफाडे यांच्या सारख युवा नेतृत्वाला केज विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन मोठी ताकद लावण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण केले आहे.राज ठाकरे हे एक परखड नेतृत्व म्हणून पाहिले जाते.मनसे च्या स्थापने पासुन आज पर्यंत केज मतदार संघात एकही उमेदवार दिला नव्हता परंतु. मतदार संघाची चाचपणी करुन रमेश तात्या गालफाडे यांच्या सारख तगडा उमेदवार देऊन .मनसेचे रेल्वे इंजिन आता केज मतदार संघात धावणार असल्याचे चित्र दिसत आहे.या दरम्यान रमेश तात्या गालफाडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केज मतदार संघात सामाजिक कार्य केलेले आहे त्या कार्याच्या माध्यमातून मतदारांची जवळीकता वाढलेली दिसतं आहे .येवढेच नव्हे तर मतदारांच्या पसंतीस उतरले आहेत.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि रमेश तात्या गालफाडे यांच्या विचाराचे रेल्वे इंजिन केज मतदार संघात धावल्या शिवाय रहाणार नाही आशी चर्चा नागरिक करत आहेत