केज मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आ.नमिता मुंदडा विजयी होणार
केज !प्रतिनिधी
केज मतदारसंघातील निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. निवडणूक होत असली तरी केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी केज मतदारसंघातील जनता भाजप महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांनाच निवडून देणार असल्याचे दिसून येत आहे.
आ.नमिता मुंदडा या त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे केज विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटू लागला आहे. मुंदडा कुटुंबाचे समर्थक सध्या आमदार ताई सोबत प्रचारात सक्रिय आहेत. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भाजप महायुतीच्या उमेदवार आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्याकडे केज मतदारसंघात विश्वासू कार्यकर्त्यांची मजबूत फळी व संघटन आहे.
मागील पाच वर्षांत केज मतदारसंघात केलेल्या सातत्यपूर्ण भरीव विकास कामांमुळे आ.नमिता मुंदडा यांनी प्रचारात इतर उमेदवारांपेक्षा मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांची खंबीर साथ आ.नमिता मुंदडा यांच्यासोबत असल्याने आ.मुंदडा यांचा विजय सुकर झाला आहे. असे वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे.अंबाजोगाई शहरातून प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते आ.नमिता मुंदडा यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्न करीत आहेत. आ.नमिताताई मुंदडा यांनी दि.६ नोव्हेंबर रोजी केज मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांना भेट दिली व सर्वांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.