माजी आ.संगिता ठोंबरे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश
केज! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. संगिता ठोंबरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असून दररोज मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
बीड जिल्ह्याचे खा. बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत संगिता ठोंबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आ. संगिता ठोंबरे यांना पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र संगिता ठोंबरे यांना खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, दिलीप काळे, दिपक शिंदे यांच्यासह संगिता ठोंबरे यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते.
माजी आ.संगिता ठोंबरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने निश्चितच पृथ्वीराज साठे यांची ताकद वाढली आहे.