केज ! प्रतिनिधी
माऊली विद्यापीठाचे सचिव तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य अशोकराव पाटील
यांच्या जन्मदिनानिमित्त माऊली विद्यापीठ अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात , वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे यांच्या नियोजनातून उपक्रम घेण्यात आले.
महिला महाविद्यालयात वृक्षारोपण, प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप,भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय, महाविद्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.सरस्वती प्राथमिक मध्ये चित्रकला स्पर्धा,फळे वाटप,सरस्वती महाविद्यालय प्रांगणात वृक्षारोपण, प्राथमिक माध्यमिक विद्यालय उमरी येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. रामराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात फळे वाटप करण्यात आले.सरस्वती कन्या प्रशाळेत गीतगायन स्पर्धा, व खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना फळे वाटप सरस्वती मुलींचे वस्तीगृहोतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्राचार्य डॉ दत्ता ढास, डॉ संध्या आयस्कर,
मुख्याध्यापक धनराज सोनवणे, मुख्याध्यापक डी एस खोसे,प्राचार्य डॉ जी बी पाटील, उप प्राचार्य डॉ किरणकुमार धीमधीमे, डॉ हनुमंत सौदागर ,श्रीकांत लुंगारे मुख्याध्यापिका वंदना डोंगरे, मुख्याध्यापक राम कांबळे ,मुख्याध्यापक
नितीन रसाळ ,मुख्याध्यापक संदीप सत्वधर,विलास जाधव, आदींच्या नियोजनातून उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *