शिक्षण संपताच मिळवली नोकरी.

केज ! प्रतिनिधी

चिंचोली माळी येथील मूळ रहिवासी असलेले  दैनिक दिव्य लोकप्रभा चे केज तालुका प्रतिनिधी तथा झुंजार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव दळवे यांची कन्या कु. गीतांजली महादेव दळवे हिने पहिल्याच प्रयत्नात नेत्र चिकित्सक मधील महत्वाची ऑटोमॅटिक अँड व्हिजन सायन्स ही पदवी संपादन केली. गीतांजलीचे प्राथमिक शिक्षण केज येथील स्वामी विवेकानंद शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण वसंत महाविद्यालय केज येथे झाले बारावी सायन्स नंतर डॉ .डी वाय पाटील ऑटोमेट्री सायन्स पुणे महाविद्यालयात प्रवेश मिळवून ही पदवी प्राप्त केली.
उल्लेखनीय म्हणजे शिक्षण संपताच तिला रिलायन्स उद्योग समूहात चांगल्या हुद्द्यावर नोकरीची संधी  मिळाली.
तिच्या या यशाचे श्रेय आई वडील, भाऊ, शिक्षक व दळवे परिवार चिंचोली माळी यांना देते.
तिच्या या यशाबद्दल लवकरच झुंजार पत्रकार संघाच्या वतीने  सत्कार करण्याचे नियोजन केले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *