तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन
केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसुफवडगाव व आडस मंडळ परिसरात दि. 23 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, वीज व्यवस्था तसेच नागरिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच मौजे सोनिजवळा येथील शेतकरी कै. दिगांबर ससाणे यांचा अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
वादळामुळे अनेक गावांमध्ये वीज पोल व तारा धोकादायक अवस्थेत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली.
हे निवेदन अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा केज पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते मा. ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे, युवा नेते मा. रणजित आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, युवक अध्यक्ष शिवदास थळकरी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गोविंद. ससाणे, बाजार समितीचे संचालक तथा सरपंच कैलास पाटील, सुशिल अंधारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
