अंबाजोगाई ! प्रतिनिधी

 

येथील रिंगरोडवरील बँक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या एका भीषण आगीत लहू आणि अंकुश सुरवसे या दोन भावांनी अत्यंत कष्टाने उभा केलेले ‘विराट इलेक्ट्रॉनिक्स अँड भांडी फर्निचर’ हे दुकान, गोडाऊन आणि फर्निचर तयार करण्याचा कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून ती पूर्णपणे आटोक्यात आणली.
सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने ग्राहकांसाठी दुकानामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी आणि तयार फर्निचरचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. तसेच कारखान्यातही नवीन फर्निचर बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, मध्यरात्री अचानक लागलेल्या या भीषण आगीने सर्व स्वप्नांची राख रांगोळी केली असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकले नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभा केलेला हा व्यवसाय डोळ्यादेखत भस्मसात होताना पाहून सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *