केज ! प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले.संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला.
रविवार रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेऊन खा.रजनीताई अशोकराव पाटील यांनी सांत्वन केले.
यावेळी अश्रू अनावर झाले होते.जुन्या आठवणी मन सुन्न करून गेल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित दादा पवार हे स्पष्टवक्तेपणा, परखडपणा यामुळे कायम स्मरणात राहतील.पाटील आणि पवार कुटुंबाचा कायम स्नेह होता.
पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. दुःख
पेलल्या शिवाय पर्याय नाही ते क्रमप्राप्त आहे अशा भावना व्यक्त झाल्या.
