केज ! प्रतिनिधी
तालुक्यातील जवळबन वीज उपकेंद्रात सोलर प्लॅन्ट ५ एम व्ही ए कार्यरत झाल्यामुळे परिसरातील आनंदगाव,सारणी, जवळबन शिवारातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आता दिवसभर मुबलक वीज पुरवठा उपलब्ध होत आहे
अशी माहिती उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता
प्रकाश वैरागे यांनी दिली.सध्या रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा ऊस आदी पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना
आवश्यक होत. शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन वीज उपकेंद्राकडून सौर प्लांट उभा करण्यात आला आणि याद्वारे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी थ्री फेज मुबलक असा दिवसभर वीज पुरवठा उपलब्ध होत आहे
याबद्दल शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी बद्दल समाधान व्यक्त केले आहे.यापूर्वी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेमध्ये पिकाला पाणी देण्यासाठी अंधाराचा सामना करावा लागायचा यावेळी अनेक अपघात घडून यायचे मात्र आता दिवसभर विद्युत पुरवठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी झाला आहे. पिकाला मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या
विद्युत पुरवठा नियोजनासाठी
वरिष्ठ तंत्रज्ञ डी बी पुरी,आर जी राठोड,एस एस फड यांच्या सहयोगातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या जात आहेत.
