केज! प्रतिनिधी
अन्न हे पुर्णब्रह्म आहे,पौष्टिक व सकस आहाराने शरीरास पोषक तत्व मिळतात याची जाणीव ठेवून केज मतदार संघाचे युवा नेतृत्व ऋषीकेश भैय्या आडसकर यांच्या वाढदिवसानिमित्त ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे यांनी स्वामी समर्थ वृध्दाश्रम येथे वृद्धांना अन्नदान करुन वाढदिवस साजरा केला.
अन्न पुर्ण ब्रम्ह या पवित्र परंपरेला साजेसे कार्य करण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे यांनी मिष्ठान्न भोजन देऊन वृध्दाश्रम येथे वृद्धांसोबत केला नेत्यांचा वाढदिवस साजरा गोविंद ससाणे हे राजकीय, सामाजिक कार्यत नेहमी अग्रसर असतात स्वामी समर्थ वृध्दाश्रम येथे वृद्धांसोबत हितगुज साधत वृध्दांना आधार देण्याचं काम केले आई, वडील हे आयुष्यत एकदाच मिळणार दान आहे त्यांचा संभाळ करा त्यांना आश्रमाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ येऊ नये आई वडीलांचा संभाळ करा बाहेर मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात का़हीचे मुल प्राध्यापक, शिक्षक, डाक्टर, इंजिनिअर आहेत आणि आई वडील वृध्दाश्रमात हे न शोभणारी गोष्ट आहे आशा शब्दात भावना व्यक्त केल्या मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करेल असे बोलताना सांगितले यावेळी पत्रकार मुबशीरोदीन खतीब,दशरथ चवरे,अनिल ठोंबरे, स्वामी समर्थ वृध्दाश्रमाचे संचालक महादेव कराड मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार स्वामी समर्थ वृध्दाश्रमाचे संचालक महादेव कराड यांनी मानलें
