केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल निमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे यांनी एकवीस हजार नउशे ऐकवीस रुपये देणगी दिली आहे

या बाबत सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील सोनिजवळा येथे दरवर्षी याही वर्षी हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल होत आहे या संदल निमित्त गावातील सर्व अठरापगड जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गावच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत, या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो, किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आसो, लोकशाही आण्णा भाऊ साठे जयंती आसल, किंवा संदल यात्रा, जत्रा, लग्न गावा मध्ये काही पण कार्यक्रम आसोत सोनिजवळा येथील अठरापगड जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे करतात साध्या जाती धर्मा मध्ये तेढ निर्माण होत आहे परंतु सोनिजवळा येथील सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, व सर्वांच्या कार्यक्रमाला व मदतीला धाऊन जातात या संदल साठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे यांनी 21921 रुपये देणगी देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे यांच्या संदल कमिटीच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले आहे

सर्व गावातील नागरिकांना संदल कमिटीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की संदल निमित्त उद्या ठिक 5 ते8 च्या दरम्यान जेवनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन हजरत महबुबी सुभानी दर्गा संदल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *