केज! प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या
एसबीआय बँकेच्या अधिकारी संघटनेच्या निवडणुकीत महासचिव म्हणून निवडून आलेल्या डॉ.सतीश टाके यांनी केज येथील श्री स्वामी समर्थ मठात भेट दिली.यावेळी त्यांनी श्री.स्वामी समर्थांच्या बाल रूपातील अजानबाहु मुर्तीचे व पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त मंदार देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले व श्री स्वामी समर्थांची मूर्ती देवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी गणेश देशपांडे, दिनेश देशपांडे, राजेश देशपांडे,विनायक ठोंबरे, रोहन वेदपाठक, संतोष रिनवा यांची उपस्थिती होती.
