जनतेचा एकच नारा लहु बनसोडे आमदार करा

केज ! प्रतिनिधी

सध्या केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातच केज तालुक्यातील पाथरा येथील रहिवासी लहु बनसोडे हे दलीत पुत्र सध्या केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यांना या पुर्वी गोरगरीबांच्या हिता साठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून गोरगरीब व सामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहो रात्र आंदोलन करुन आवाज उठला. गोरगरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पाथरा या गावी डॉ बाबासाहेब आंबेडकर अनु जाति आश्रम शाळा सुरू करुन गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ते धडपडत आहेत स्वतः हा झोपडीत राहुन गोरगरीबा साठी चौवीस तास झगडत राहणाऱ्या या दलित पुत्राला केज मतदार संघात वाढता पाठिंबा मिळत आहे . गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी केज विधानसभा निवडणुक लढविणार आणि जिंकणार सुध्दा आसा निर्धार करुन जनतेत मिसळलेल्या व झोपडीत रहाणारा उमेदवार लहु बनसोडे म्हणून या उमेदवारांला जनतेत लोकप्रियता मिळत आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *