केज मतदारसंघात सौ. नमिता मुंदडा यांनी आणलेल्या निधी मुळे मतदार संघाचा झाला विकास,
केज!प्रतिनिधी
केज मतदारसंघात उमेदवारी फार्म काढून घेण्याची तारीख संपली आणि मतदार संघात चित्र स्पस्ट झालेले दिसून येत आहे जशी निवडणूक जवळ येत आहे. तशी निवडणूकीतील रंगत रंगात येणार आहे. कोणी कुठेही जावू द्या कांहीच फरक पडणार नाही मतदार संघात प्रचारादरम्यान एकच मुद्दा महत्त्वाचा होणार आहे, तो म्हणजे मतदार संघात केलेला आणि झाले ला विकास भाजपाच्या उमेदवार आ.नमिताताई मुंदडा यांनी मतदार संघात रेकॉर्ड ब्रेक केलेला विकास, आणि मतदार संघात आणले ला निधी याच मुद्दयावर प्रचारात चांगली च रंगत येणार आहे. केज मतदारसंघात आ.नमिता मुंदडा यांनी आणले ला विकास निधी जनतेला माहित आहेच, आणि त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातून सौ. नमिता ताईंना मतदार संघातील जनता मतदान रुपी आशिर्वाद देणार यात शंकाच नाही.
केज मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने केज तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांनाभेटी दिल्या,तसेच या प्रचारफेरी दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत जनवेशी असलेला स्नेह आणि विकास कामांसाठी आणलेल्या भरघोस निधीमुळे, झालेल्या अनेक विकास कामांमुळे आणि विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे तसेच तिर्थक्षेत्रांच्या प्रभावी विकासा मुळे भाजप उमेदवार आमदार सौ.नमिता मुंदडा या मतदार संघातील जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. तसेच त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व जनतेचे म्हणणे ऐकून त्याची तात्काळ अंमल बजावणी करणे या मुळे आ.नमिता मुंदडा याप्रचारात एक पाऊल पुढेच आहेत. समाजसेवक तसेच भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी) नेतृत्वाखाली भाजप नेते, कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचारात सहभागी झाले असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे अशी चर्चा जनतेतून ऐकण्यास येत आहे. भाजपाच्या उमेदवार आ.नमिता मुंदडा यांना प्रचारात जोरदार प्रतिसाद मिळत आहे.