मनोज दादा जरांगे पाटील यांनी काय दिला आदेश!

केज! प्रतिनिधी

संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवाहन केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने जरांगे पाटील यांनी निवडणुकीतुन माघार घेत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.कोणताही उमेदवार एका जातीच्या मतावर निवडून येत नसल्याचे सांगितले व मराठा समाजाला असे आवाहन केले की कोणाच्याही सभेला जायचं नाही. ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे .त्याला पडायचं गुपचूप जायचं मतदान करून परत यायचं व पडल्यावर सांगायच कसा करेक्ट कार्यक्रम केला .बऱ्याच उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांची मात्र या निर्णयाने निराशा झाल्याची दिसत आहे. आज सकाळीच मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली की निवडणुकीतून माघार घेत. असून आपल्या मराठा तरुणांनी अर्ज मागे घ्यावेत व ज्याला पाडायचे त्याला पाडा असा आदेश दिला. म्हणून जरांगे यांनी मराठा समाजातील लेकरासाठी त्यांना आरक्षण मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार लढणार व आरक्षण मिळवून देणारच असा विश्वास व्यक्त केला .यामुळे महायुतीमधील काही उमेदवाराची नक्कीच धाकधूक वाढल्याचे दिसत आहे .

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *