केज येथील टोलनाक्या जवळ पीक-अप आणि स्विफ्टचा अपघात : अपघात आठ जखमी
केज ! प्रतिनिधी
केज-बीड रोडवर गंगामाऊली साखर कारखाना असलेल्या टोल नाक्यावर पासून काही अंतरावर स्विफ्ट आणि पीक अपच्या अपघातात आठ जण जखमी असून त्यात दोन महिला मुलगा व चार पूरूष यांचा समावेश आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वाजता केज मांजरसुंबा रोडवर गंगा माऊली साखर कारखान्या जवळ असलेल्या टोल नाक्या पासून सुमारे २०० मिटर अंतरावर एक भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार क्र. (एम एच-१४/एफ सी-२०३८) ही अंबाजोगाई ते बीडच्या दिशेने जात होती ती कार आणि पुण्याकडून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील त्यांच्या गावाकडे जात असलेल्या एका पिक-अप क्र. (एम एच १४/एच यु ७१४२) यांची समोरा समोर
जोराची धडक झाली. या अपघातात पीक अप चे ड्राइव्हर साईडचे टायर तुटून पडले आहे. अपघातात स्विफ्ट मधील चौघे आणि पीक-अप मधील दोन महिला न दोन मुले असे एकूण आठजण जखमी झाले आहेत.
त्या पैकी आवेज सुभान गवळी यांच्या हाताला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून जिजाबाई व्यंकट कानगुटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून ते दोघे गंभीर जखमी आहेत. तसेच अलिफ शेख, महम्मद साबेर शेख, अझर आणि शोभा नाना कानगुटे यांच्यासह दोन मुले असे एकूण आठजण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच केज स्टेशन चे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव आणि त्यांचे सहकारी पोलीस नाईक संतोष गित्ते हे घटना स्थळी हजर झाले.
