घरकुलासाठी ग्रामविकास अधिकारी किंवा सेल्फ सर्व्हे करून नोंदणी करा – गोविंद ससाणे,मिनाज पठाण
३० एप्रिलपर्यंत मुदत वाढ जास्तीत जास्त लाभार्थी यांनी लाभ घ्यावा आसे ग्रामपंचायत सदस्य प्रताप वैरागे, महादेव वसेकर, देविदास जोगदंड, जब्बार शेख, प्रकाश जोगदंड, कल्याण पवार यांनी आवाहन केले आहे
केज! प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी सद्या सर्व्हे सुरु आहे. सोनिजवळा येथील नागरिकांनी सद्या सुरु असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोविंद ससाणे,मिनाज पठाण यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी सोनिजवळा येथे सद्या सर्व्ह सुरु आहेत. यामध्ये आपली नोंदणी सेल्फ सर्व्हे करण्यासाठी aawas plus
हे शासनाचे अधिकृत अॅप प्ले स्टोअर्सवरून आपल्या मोबाईलमध्ये इंस्टोल करावे, नंतर aadhar Face rd देखील इंस्टॉल करून घ्यावे. त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन करून अॅपवर विचारलेली माहिती भरुन शेवटी आपल्या कच्या घराचा फोटो व आपण बांधणार असलेल्या घराची जागा याचा फोटो अपलोड करावा. आधार व जॉब कार्डचे व्हेरिफिकेशन करून केलेला सर्व्हे अपलोड करावा.
नोंदणी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी आर .के.चवरे , किंवा आपण स्वतः सेल्फ सर्व्हे करून आपली नोंदणी करु शकता. एक ते दहा निकषांचे पालन करून कच्चे घर असणाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास
योजनेत आपली नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असून त्या अगोदर सोनिजवळा येथील नागरिकांनी आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन गोविंद ससाणे,मिनाज पठाण, देविदास जोगदंड, जब्बार शेख , प्रताप वैरागे, महादेव वसेकर, प्रकाश जोगदंड, कल्याण पवार यांनी केले आहे
