साबला ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त महिलांचा सत्कार संपन्न .
केज – प्रतिनिधी
तालुक्यातील साबला येथील ग्रामपंचायत कार्यालयात ” महाराष्ट्र दिनानिमित्त ” प्रथम राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , चेरमन उत्तमराव काकडे , मुख्याध्यापक धनराज धाट – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , साबला . अध्यक्ष शंकर नाईकनवरे – शालेय व्यवस्थापन समिती , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , साबला . सहशिक्षिका श्रीमती वंदना फाटे , अंगणवाडी शिक्षिका सुनंदा काकडे , अंगणवाडी मदतनिस श्रीमती काशिबाई राऊत साबला , आरोग्य सेविका श्रीमती वर्षा काकडे , नवनिर्वाचित अंगणवाडी मदतनिस श्रीमती शोभा मुळे , ग्रामपंचायात कर्मचारी गुलाब मुळे , विश्वनाथ नाईकनवरे यांच्या हस्ते राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहन उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले .
महिलांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग , महाराष्ट्र राज्य . यांच्या वतीने ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” पुरस्कार सन – 2024 / 25 हा पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सामाजिक , राजकिय , धार्मिक , शैक्षणिक , सांस्कृतिक क्षेत्रात उत्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना ट्रॉफी , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . त्यामध्ये श्रीमती आश्रुबाई श्रीमंत काकडे , श्रीमती पारुबाई श्रीमंत नाईकनवरे या महिलांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे .
श्रीमती आश्रुबाई श्रीमंत काकडे – यांच्या बाबतीत थोडक्यात माहिती अशी आहे . की त्या स्वतः ग्रामपंचायत सदस्य साबला . म्हणून राजकारणात सक्रिय आहेत . तसेच त्यांची दोन्हीही मुलं शिक्षण घेऊन वेगवेळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत . त्यांचे थोरले चिरंजीव हे पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे स्वतःचा फ्रुटचा व्यवसाय करतात . तर धाकले चिरंजीव हे मुंबई येथे राष्ट्रीय कृत बँकेत नोकरी करतात . त्याचप्रमाणे श्रीमती पारूबाई श्रीमंत नाईकनवरे यांचे पती देखील दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून तर एक वेळेस सेवा सहकारी सोसायटी संचालक म्हणून त्यांनीही राजकीय क्षेत्रात काम केले आहे . त्यांच्याही मुलांनी शिक्षण घेऊन त्यांचीही दोन्ही मुलं हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत . त्यामध्ये त्यांचे थोरले चिरंजीव हे शिक्षण क्षेत्रात माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत . ते शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करण्याचे काम करतात . तर धाकले चिरंजीव हे पुणे येथील कंपनी मध्ये चांगल्या प्रकारच्या जॉब चे ते काम करतात .
म्हणून या दोन्हीही महिलांची निवड करून त्यांचा सन्मान उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे , समाजसेवक नरहरी काकडे , ग्रामपंचायत अधिकारी तानाजी शिंपले , पोपट काकडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले , यावेळी राहुल मुळे , श्रीमंत नाईकनवरे , उमाशंकर शिंदे , श्रीमंत काकडे , राजेभाऊ काकडे , जालींदर मुळे , लक्ष्मण काकडे , उद्धव नाईकनवरे , माजी उपसरपंच अभिमान नाईकनवरे , भारत काकडे , माजी व्हाईस चेरमन आत्माराम काकडे , मेजर अशोक काकडे , चत्रभुज मुळे , रामचंद्र काकडे , सावताराम नाईकनवरे , अंगद काकडे , रामदास मुळे , पवन सरवदे , अंकुश काकडे , रामभाऊ काकडे , अनंत नाईकनवरे , धनेश्वर पांचाळ यावेळी गावातील इत्यादी नागरिक उपस्थित होते .
