साबला येथील सरपंच यांनी स्वखर्चाने दिले ग्रामपंचायत कार्यालयास कुलर भेट .
केज ! प्रतिनिधी ,
तालुक्यातील साबला येथील सरपंच सौ . जनाबाई नरहरी काकडे यांनी स्वतः च्या पगारीचे पैसे साठवून सात हजार पाचशे रुपयाचे नविन कुलर खरेदी केले . ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ते नविन खरेदी केलेले कुलर ग्रामपंचायत कार्यालयास भेट म्हणून दिले .
तसेच पंचायत समिती कार्यालय , केज . यांच्या वतीने नुतन ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शिंपले साहेब यांची नेमणूक ग्रामपंचायत कार्यालय , साबला . ठिकाणी करण्यात आली आहे . म्हणून ग्रामपंचायत अधिकारी शिंपले साहेब यांचा सन्मान सरपंच सौ . जनाबाई काकडे साबला . सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ यांनी केला . व सेवा सहकारी सोसायटी संचालक दशरथ कटारे , सदाशिव काकडे तसेच भागवत काकडे , अरूण काकडे , महादेव नाईकनवरे , सुदाम नाईकनवरे , बाबासाहेब काकडे , गुलाब मुळे इत्यादी गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते .
