सी. बी. एस. इनामदार (नाहोलीकर)यांच्या वाढदिवसानिमित्त ढकली व्हालीबॉल स्पर्धेचे आयोजन.
केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील नाहोली मुळगाव असलेले सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सी.बी.एस. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. युवराज मगर मित्र मंडळ केज यांनी ढ
कली हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे . या स्पर्धेत यशस्वी आठ संघास बक्षीस मिळणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे शुक्रवार दि.२५-४-२०२५ रोजी सायं ७-०० पंचायत समिती मैदान केज येथे करणार आहेत.सी. बी. एस. इनामदार हे शासकीय सेवेत असताना शासनाच्या योजना सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी लोकापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून खंडपीठात याचिका दाखल करून ८० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला.
या कार्यक्रमास मा.आ. पृथ्वीराज साठे सह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे असंख्य कार्यकर्ते हजर राहणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमास हजेरी लावावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरदचंद्रजी पवार) गटाने केले आहे
