कानडीमाळी येथील इयत्ता सातवी वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न .
केज ! प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , कानडी माळी . या शाळेत शैक्षणिक वर्ष सन – 2024/25 या इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गिरी सर , प्रमुख पाहुणे सरपंच अशोकराव राऊत कानडीमाळी , मुख्याध्यापक संतोषराव गरडे – कानेश्वर विद्यालय , कानडीमाळी . आदर्श शिक्षक नरहरी काकडे हे होते .
कार्यक्रमाची सुरुवात ही कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ज्ञानज्योती , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी सांगितले की सध्याचे युग हे स्पर्धेचे , तंत्रज्ञानाचे युग आहे . स्पर्धेत टिकायचे असेल तर यासाठी तुम्हांला खूप प्रयत्न करावे लागतील . दगडाला देव पण कधी प्राप्त होते . ज्या वेळेस अगोदर छनीचे घाव सोसावे लागतात त्याच वेळेस देव पण प्राप्त होते . त्याच प्रमाणे आपलीही अवस्था आहे . शालेय शिक्षण घेत असताना मन एकाग्र करून अभ्यास करणे . वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करणे . शालेय शिस्तीचे पालन करणे . वडील धारी व्यक्ती यांचा सन्मान करणे . आपल्या हातून कोणाचेही वाईट नुकसान होणार नाही याची काळजी घेणे . इत्यादी गोष्टींचा विचार करावा .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरी सर , प्रमुख पाहुणे सरपंच अशोकराव राऊत , मुख्याध्यापक संतोषराव गरडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन हे राऊत डी . टी . , श्रीमती सुतार मॅडम , श्रीमती शेळके मॅडम , श्रीमती बोराडे मॅडम , श्रीमती दुबाले मॅडम यांनी केले होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोनवणे सर यांनी केले तर आभार राजगिरे सर यांनी मानले .

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *