माजलगावात भर दिवसा कोयत्याने वार करून
भाजप कार्यकर्त्याचा खून

माजलगाव ! प्रतिनिधी

 

शहरातील स्वामी समर्थ मंदिर च्या पाठीमागील रस्त्यावर भाजप कार्यालयासमोर भाजपचे तालुका सरचिटणीस लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे वय 30 वर्ष यांचा आज मंगळवारी एका तरुणाने भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करत खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला.
-आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरा पाठीमागे रस्त्यावर भाजप कार्यालय आहे या कार्यालयाच्या समोर भाजपच्या तालुका सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर हा उभा असताना तेथे नारायण शंकर फपाळ राहणार बेलूरा हा तरुण आला व त्याने आगे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले या वाराने आगे ह्या जागीच रक्तबंबाळहून कोसळला व गतप्राण झाला. घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्या लेखनाची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ माहिती घेत आहेत.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *