केज येथे आझाद क्रांती सेनेची तालुका स्तरीय बैठक संपन्न
केज तालुक्याची कार्यकारिणी जाहीर शरद थोरात तालुका अध्यक्षपदी तर अमोल गालफाडे तालुका उपाध्यक्ष तसेच इरफान पठाण यांची शहर प्रमूख पदी निवड करण्यात आली.
केज ! प्रतिनिधी
केज येथील शासकीय विश्रामगृहामध्ये १५/०४/२०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजता राजेशजी घोडे यांच्या भक्कम नेतृत्वात बैठक संपन्न झाली. यावेळी विचार मांडत असताना आझाद क्रांती सेनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली याची सविस्तर माहिती राजेशजी घोडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत तरी अर्थिक आणि सामजिक स्वातंत्र्य समाजात प्रस्थापित झालेले नाही. सामजिक विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आपल्या अनेक पिढ्या मनुवादी व्यवस्थेमुळे बरबाद झालेल्या असल्यामुळे मनुवादी व्यवस्था मुळापासून उपटून टाकण्यासाठी आझाद क्रांती सेनेचा जन्म झाला आहे. असे यावेळी बोलताना राजेश घोडे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खरी चळवळ आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातुन पुढे चालवली जात आहे. या सेनेचे कार्यकर्ते देश विदेशात देखिल आहेत.
भारत हा तरुण देश आहे. हा जर तरुणांचा देश आहे तर मग आझाद क्रांती सेना सुद्धा तारुण्यात आहे आणि याच ताकतीने भविष्यात ही सेना काम करेल असे आश्वासन सेनाप्रमुख राजेश घोडे यांनी दिले.
आपल्या अनेक पिढ्या मनुवादी गुलामित खाक झाल्या असुन त्यावेळी झालेले अन्याय अत्याचार आपल्याला विसरता येणार नाहीत. आक्रमक भूमिका घेऊन अपल्याला या व्यवस्थेच्या विरोधात ताकतीने लढावं लागेल, याची देखिल आठवण यावेळी त्यांनी करून दिली.
प्राध्यापक सिद्धार्थ शिनगारे यावेळी आवर्जून उपस्थीत होते.
नेता कसा असला पाहिजे, त्याची कार्यकारणी कशी असली पाहिजे याची सविस्तर माहिती देत असताना स्व. एकनाथरावजी आव्हाड यांच्यानंतर त्यांचे काम खऱ्या अर्थाने जर कोणी पुढे नेत असेल तर ते रमेशजी घोडे आहेत. एकनाथ आव्हाडांची हुबेहुब छवी राजेशजी मध्ये दिसून येत असल्याचे यावेळी बोलतांना ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावलेली होती. गायरान जमिनी संदर्भात अनेकांनी आपल्या समस्या व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचान सामजिक कार्यकर्ते बाबूराव गालफाडे सर यांनी केले. आभार प्रदर्शन तुकाराम शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच व्यवस्थापन शरद थोरात यांचेकडे होते.
महादेव आव्हाड, महादेव अडागळे, किसन भिसे, विनायक लोंढे, बळीराम मस्के, अशोक ढगे, अरुण आव्हाड, बाळू आव्हाड, संतोष जोगदंड, दत्तात्रय झाडे, सय्याजी ढवळे, अर्जुन शिंडे, बालाजी गोंडे, अर्जुन शिंदे, जालिंदर कसबे, पांडूरंग कसबे, राजू लांडगे, दिलीप गालफाडे, परशुराम मोरे
यावेळी आवर्जून उपस्थीत होते.
