केज शहरातील भीम नगर व क्रांती नगर सह पाच ठिकाणी हारुणभाई इनामदार व सीताताई बनसोड यांच्या हस्ते ध्वजारोहण
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठया उत्साहात साजरी
केज/प्रतिनिधी
केज शहरातील भीम नगर व क्रांती नगर सह पाच ठिकाणी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या हस्ते भीम नगर व क्रांतीनगर सह शहरातील पाच ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण करण्यात आले आहे.
केज शहरातील भीम नगर, क्रांतीनगर, वकीलवाडी, शिक्षक कॉलनी, कळंब रोड या भागामध्ये पाच ते सहा दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले आहेत.
दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर शहरातील सर्व जयंती उत्साहाच्या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप दिपानी पूजन करून वंदन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, सीताताई बनसोड, राजूभाई इनामदार, नगरसेविका सौ. पद्मिनी अक्का शिंदे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात सर, आरपीआयचे जिल्हा संदीपान तात्या हजारे, पत्रकार तात्या गवळी, युवा नेते लखन हजारे, प्रवीण मस्के, विजय लांडगे,रोहित कसबे, पवन बनसोड, शकील सय्यद, नागेश जावळे, शितल लांडगे, बाबुराव गालफाडे यांच्यासह सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहरातील जयंती उत्सवास उपस्थिती लावली. यावेळी जयंती उत्सव कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल,हार,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने सर्व जयंती उत्सवाच्या ठिकाणी भेटी देऊन निळ्या ध्वजास मानवंदना दिली.
