झुंजार पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश गुळभिले तर सचिवपदी रमेश इतापे यांची निवड.
केज । प्रतिनिधी
केज तालुका झुंजार पत्रकार संघाची कार्यकारिणी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून २०२५ – २६ च्या झुंजार पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी पत्रकार रमेश गुळभिले तर सचिवपदी रमेश इतापे यांची निवड करण्यात आली.
दि,४ एप्रिल शुक्रवार या दिवशी झुंजार पत्रकार संघाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. झुंजार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ चवरे यांच्या अध्यक्षते खाली व जेष्ठ पत्रकार सतीश केजकर यांच्या मार्गदर्शनाखाली झुंजार पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या यावेळी अध्यक्ष पदी रमेश गुळभिले तर सचिव पदी रमेश इतापे , उपाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, सहसचिव दादासाहेब आगे, कोषाध्यक्ष महादेव दळवे, मार्गदर्शक सतीश केजकर, विधीतज्ञ सल्लागार म्हणून अॅड.निखिल बचुटे नंदकुमार मोरे, दिनकर राऊत, सुमित मोरे, दशरथ चवरे, या वेळी उपस्थित होते , अगदी खेळीमेळीच्या वातावरणात निवडी पार पडल्या गेल्या पाच वर्षापासून झुंजार पत्रकार संघाने नेहमीच सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवला आहे तसेच इतर कार्यात नेहमी च प्रशंसनीय कार्य केलेले असून या पुढे हि झुंजार पत्रकार संघ व संघाचे सर्व पदाधिकारी तसे सन्माननीय सदस्य आपल्या संघाचे कार्य धडाडीने करतील असे नवनिर्वाचीत पदाधीकारी यांनी सांगितले या निवडी चे सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
शेतकरी, गोरगरीब, वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी केज येथे नवनिर्वाचित झुंजार पत्रकार संघाची पाच वर्षा पूर्वी स्थापना करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. तसेच झुंजार पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
