केज तालुक्यातील विज पडून एका शेतकऱ्या सह गाईचा गेला जिव

केज ! प्रतिनिधी

दुपारी केज तालुक्यातील आडस,केकानवाडी या भागात अवकाळी पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून शेतकऱ्याचा अन् गायीचा मृत्यू झाल्याची घटना तासभरा पूर्वी घडली आहे.

देवीदास शहाजी केकाण (वय ६५ वर्ष) रा. केकाणवाडी असे वीज कोसळून मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते दुपारी आसरडोह रस्त्याकडील नवरुका शिवारात जनावरे चारीत होते. यावेळी अचानक पाऊस आल्याने ते लिंबाच्या झाडाखाली उभे होते. यावेळी या झाडावर वीज कोसळून शेतकरी देवीदास केकाण जागीच ठार झाले तर एक गाय ही दगावली आहे.
वेधशाळेने गारपीट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजा प्रमाणे आज दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील आडस परिसरात सुसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या घटनेची माहिती तालुका प्रशासन आणि आडस पोलीस चौकीला देण्यात आली आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *