तमीळनाडू राज्यातील सोने चोरीचे बीड जिल्हा कनेक्शन !
चोरी तमिळनाडूत चोर लातूरचे आणि सोने विकले बीड जिल्ह्यात
केज! प्रतिनिधी
बीड जिल्हा या ना त्या कारणाने गाजत असून आता थेट तामिळनाडू राज्यातील चोरीचे सोने बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथील व्यापाऱ्याला विकले आहे. तमिळनाडूचे पोलीस दोन दिवसा पासून त्या सोनाराच्या शोधात नांदुरघाट येथे तळ ठोकून असून चोरीचे सोने मिळाले; मात्र चोरीचे सोने खरेदी करणारा आरोपी घराच्या छता वरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, काही दिवसापूर्वी तमिळनाडू राज्यातील एका सराफा दुकानातून चोरट्यांनी एक किलो दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची चोरी केली होती. ते चोरीचे सोने त्यांनी नांदुरघाट येथील सोन्याचे सराफा व्यापारी अनिल बडे यांना विकले होते. या सोन्याची किंमत एक कोटींच्या घरात आहे. अनिल बडेंनी मात्र चोरट्या सोबत २५ लाख रूपयांची डील केली होती. त्या पैकी त्याने १४ लाख रूपये चोरट्यांना दिले होते. उर्वरित ११ लाख रूपये देणे बाकी होते. तमिळनाडू पोलिसांनी या चोरीचां तपास केला असता लातूर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरीचे सोने हे बीड जिल्ह्यातील नांदुर घाट येथील अनिल बडे नावाच्या सराफा व्यापाऱ्याला विकले असल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर मागील दोन दिवसा पासून तमिळ नाडु चे पोलीस हे केज पोलिसांच्या मदतीने नांदुरघाट येथे सापळा लावून दबा धरून बसले होते. पोलीसांनी अनिल बडे याच्या घरावर छापा मारला असता त्यात त्याने दरोड्यातील विकत घेतलेले एक किलो सोने सापडले मात्र चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी अनिल बडे मात्र घराच्या छतावरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. तमिळ नाडू पोलिसांना मदत करण्यासाठी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदूर घाट चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे, शमीम पाशा यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दोन दिवसा पासुन तमिळ नाडु पोलिसांचा तळ :- दरोड्यातील चोरट्या कडून सोने खरेदी करणारा सराफ अनिल बडे याच्या मागावर दोन दिवसा पासुन पोलीस होते.
