केज तालुक्यातील येवता येथील ४९ भाविक कुंभमेळ्यासाठी प्रयागराजकडे रवाना

अवादा कंपनीने भाविकांना प्रयागराजला जाण्यासाठीचे मोफत केले आयोजन;या उपक्रमाचे सर्व स्तरातून होतेय कौतुक

केज /प्रतिनिधी

केज तालुक्यातील येवता येथील ४९ भाविक कुंभमेळ्यासाठी प्रयागराजकडे रवाना झाले आहेत तर अवदा कंपनीने भाविकांना प्रयागराजला जाण्यासाठीचे मोफत आयोजन केले आहे.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यात अवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प चालू झाला असून ज्या लोकांना कुंभमेळ्यासाठी जाण शक्य नाही अशा लोकांसाठी अवादा कंपनीने येवता येथील ४९ भाविकांना कुंभमेळ्यासाठी जाण्याची सोय केल्याने भाविकातून कंपनीचे आभार व्यक्त केले जात आहे.
या यात्रेमध्ये अवादा कंपनीकडून भाविकांच्या सर्व सुख सोयी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असेही अवदा कंपनीचे कर्मचारी राहुल देठे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे. सदरील यात्रेकरूंना आयडेंटी कार्ड देऊन यात्रेमध्ये काही अडचण आल्यास या कार्डचे महत्व समजावून सांगितले कोणी जर यात्रेच्या दरम्यान चुकले तर हे कार्ड पोलिसांना दाखविल्यास आपण कुठेही चुकनार नाहीत व अडचण भासणार नाही. आपण आपले कार्ड यात्रा पूर्ण होईपर्यंत आपल्या गळ्यात ठेवावे अशी माहिती राहुल देठे यांनी समजावून यात्रेकरूंना सांगितले. यात्रेसाठी ट्रॅव्हल्स, राहणे, जेवण यासह इतर सुविधा कंपनीकडून मोफत उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सदर यात्रा चार ते पाच दिवसांची असून या रूटवर यात्रेकरूंची सर्व सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये अवादा कंपनीकडून ट्रॅव्हलिंग जेवण व इतर सोयी करण्यासाठी अवादा कंपनीचे कर्मचारी राहुल यादव हे यात्रेकरूंच्या सोबत सर्व यात्रा पूर्ण होईपर्यंत राहणार आहेत.
सदरील यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास आप्पा जोगदंड तसेच कंपनीचे कर्मचारी राहुल देठे यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ट्रॅव्हल्स गावात आल्यानंतर सर्वप्रथम ट्रॅव्हल्सला अवादा कंपनीचे बॅनर लावून ट्रॅव्हल्सची पूजा करून गाडीला हिरवा झेंडा दाखवून ४९भाविक यात्रेसाठी रवाना झाले आहेत.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *