केज शहरासह तालुक्यातील सर्व शिधापत्रिका लाभार्थ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी-असे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले
केज/प्रतिनिधी
केज शहरासह तालुक्यातील सर्व शिधापत्रिका लाभार्थ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी-असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे तर ई-केवायसी प्रक्रिया शासन स्तरावरून स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
ज्या सदस्यांची ई-केवायसी मुदतीत पूर्ण होणार नाही त्यांचा अन्नधान्याचा लाभ शासन स्तरावरून बंद होणार आहे.
तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आपल्या गावातील रास्त भाऊ दुकानदाराशी संपर्क करून आपले ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी,ई-केवायसी करण्यासाठी संबंधित लाभार्थी यांनी रास्त भाव दुकानात समक्ष उपस्थित राहून ई-पास मशीनवर बायोमेट्रिक प्रामाणिकरण करून पूर्ण करावे असे आवाहन केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे.
जर एखाद्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण न केल्यास अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असेल याची नोंद घेण्यात यावी असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे लाभार्थ्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड आवश्यक आहे.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याचे स्वस्त धान्य दुकानदार मार्फत चालू आहे. सदर ई-केवायसी प्रक्रिया शासन स्तरावरून स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत पूर्णपणे मोफत करण्यात येत असून सदर योजनेचा केज शहरासह तालुक्यातील सर्व शिधापत्रिका लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे
