केज पंचायत समिती मध्ये गेल्या एक वर्षापासून फर्निचर धुळखात पडुन

यणारे जाणारे पुडी खाऊन मारतात पिच्चकारी

केज !‌ प्रतिनिधी

केज केज पंचायत समितीमध्ये गेली एक वर्षा पासून लाखो रुपयाचे फर्निचर धुळखात पडले आहे. परंतु सदरील काम करण्यासाठी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मुहूर्त सापडेना की, काय? असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. सदरचे फर्निचर नेमके कशासाठी आणले आहे असे काही कर्मचाऱ्यांना विचारले असता कर्मचारी सांगतात आम्हालाच फर्निचर कशाला आणले ते माहित नाही. तर काही कर्मचारी सांगतात की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिन बनवण्यासाठी प्लायवुड, टेबल तसेच आलीशान खुर्ची बॅच असे इत्यादी फर्निचर सामान जवळपास गेल्या एक वर्षापासून पंचायत समितीच्या ओरंड्यात, बाथरूमच्या बाजूला व बांधकामविभागाच्या समोर पडलेले दिसून येत आहे. सदर फर्निचर व इतर साहित्य वर यावर पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी सह इतर जण गुटखा, तंबाखू, पान खाऊन पिचकारी मारून सदरील फर्निचरचे वाटलावताना दिसत आहेत. सदरील फर्निचर जर पंचायत समिती मध्ये करायचे नसेल तर परत करावे जेणेकरून या फर्निचरचे नुकसान होणार नाही असे जनतेतून सुरू निघताना पहावयास मिळत आहेशासनाला शासकीय कार्यालयासाठी लाखो करोडो रुपयांचा निधी उपलब्ध होतो. परंतु गरिबांच्या घरकुलासाठी तुटपुंजी मदत होते त्यातही वरिष्ठ अधिकारी घरकुल लाभधारकांकडून प्रत्येक बिलासाठी हजार पाचशेची मागणी करतात लाभार्थ्यांच्या हातावर मात्र शेवटपर्यंत निराशाच राहते यामुळे घरकुल बांधकामासाठी लाभार्थी धजत नाहीत असे पंचायत समिती कार्यालय मध्ये येणाऱ्या बोलले जात आहे. मात्र शासकीय इमारतीसाठी कर्मचाऱ्यांसाठी लाखो करोडो रुपये खर्च करण्यात येतो परंतु शासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बेजाबाबदारपणे शासनाचे लाखो रुपयांचा निधी हा वाया जात आहे असे यावरून असे दिसून येते. शासनाचा पैसाचा दुरुपयोग करून नासाडी चालू आहे अशीचर्चा सध्या केज शहरासह खेड्यातील येणाऱ्या प्रत्येक नागरिकांतून ऐकण्यास येत आहे.

यावरून असे दिसून येते की, केजपंचायत समिती मधील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे की, काय? यांना सदरील फर्निचर दिसत नाही का ? यावर गुटखा खाऊन थुकणे पाणी पिलेल्या रिकाम्या बाटल्या यावर फेकणे आपण आपल्या घरात अशीच नासाडी करता का? असा सवाल आता जनता विचारत आहे.

तसेच याकडे पंचायत समितीचे कर्मचारी, अधिकारी लक्ष देतील का? हेच पाहणे आता अवचित्याचे ठरणार आहे. या प्रकरणाकडे गटविकास अधिकारी स्वतः लक्ष देतील का? कर्मचाऱ्यांना जाब विचारतील का? असे जनसामान्यातून बोलले जात आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *