कर्तव्यावर ठाम ;
वीज चोरांना फोडला घाम
केज ! प्रतिनिधी
केज महावितरणच्या कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल वाजीदअली सय्यद यांनी एक वर्षाच्या कार्यकाळात वीज चोरी बाबत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या.शहर आणि ग्रामीण भागात ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता स्वतः रस्त्यावर उभे राहून कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत. ज्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी नको आहेत अशा अनेक पुढारी,लोकप्रतिनिधी, धनदांडगे यांनी यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या. त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना कर्तव्यनिष्ठ अधिकारी नको आहेत.
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शितल सय्यद यांना कार्यालयातून वरिष्ठ आणि अनेक कर्मचाऱ्यांचा छुपा विरोध होतो आहे.त्या विरोधाला न जुमानता त्या करतात. अनेक तांत्रिक प्रश्न सोडवून नागरिकांना पूर्ण वेळ वीज उपलब्ध करून देत आहेत.
वीज चोरीचे दंड ठोठावताना कोणाचीही शिफारसीला त्या जुमानत नाहीत. धडाकेबाज कारवाईचे सत्र त्यांचे सुरू असते.
कोणत्याही वेळी ग्राहकांनी फोन लावला तर त्यांची समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्या सज्ज असल्याचे ग्राहक सांगतात.
बेधडक कारवाया करणे कर्तव्यदक्षपणे कामावर असणे यामुळे त्यांना अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते.
एका महिला अधिकारी निर्भीडपणे काम करतात अनेकांच्या धमक्या विरोध खोट्या तक्रारी यास न जुमानता त्यांनी सामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
त्यांच्या बदलीच्या रोजच चर्चा सुरू असतात मात्र बदलीला न जमानता आपण जिथे जाऊ तिथे प्रमाणिकपणे काम करू अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
अद्याप पर्यंत कोणाकडूनही कधी एक रुपया घेतला नाही. महावितरण कंपनीकडून मिळत असलेल्या वेतनावर समाधानी राहून प्रमाणिकपणे काम करणाऱ्या अशी शितल सय्यद यांची ओळख निर्माण झाली आहे.
प्रमाणिक कामामुळे केजकर त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत.
1)
ज्यांचे काम तात्काळ होते ते ग्राहक समाधानी होऊन धन्यवादचे फोन करतात मात्र तांत्रिक अडचणीमुळे ज्यांचे तात्काळ प्रश्न सुटत नाहीत ते ग्राहक मागे शिव्यांची लाखोली वाहतात.ते ही स्वीकारून मी काम करते.
शीतल सय्यद कनिष्ठ अभियंता
सोबत फोटो
