बस स्थानक संशयास्पद फिरणाऱ्यावर पाळत ठेवून चोरीचा संशय, पाठलाग करून चोरीचे ६३ मोबाईल जप्त ; एकाला अटक ; तीन जण फरार पोलिस नाईक तेजस वाव्हळे यांची कामगिरी

अंबाजोगाई ! प्रतिनिधी

 

बीड येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक तेजस वाव्हळे हे साप्ताहिक सुट्टीवर अंबाजोगाईत आले असताना बस स्थानकावर संशयस्पद फिरत असलेल्या युवकावर पाळत ठेवून त्याचा चोरीचा संशय आल्यामुळे त्यांचा करचा पाठलाग करून कारमधून चोरीचे ६३ मोबाईल जप्त केले. या प्रकरणी एकाला अटक केली असून तीन जण फरार झाले आहे. ही घटना दि.२१ जानेवारी मंगळवार रोजी घडली. या प्रकरणी पोलीस नाईक तेजस वाव्हळे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले तेजस वाव्हळे हे अंबाजोगाईला आले होते. दुपारी त्यांच्या मुलीची शाळा सुटेपर्यंत वाट पाहत ते बस स्टॅन्ड वर थांबले होते. बस स्थानकात संशयास्पथ फिरणाऱ्या युवकावर त्यांची नजर गेली.यावेळी एक तरुण याच्या हालचालीवर तो पाकीटमार आहे किंवा मोबाईल चोर आहे म्हणून त्याच्यावर पाळत ठेवली. थोड्यावेळाने तो तरुण बस स्थानका बाहेर गेला व एका कारमध्ये जाऊन बसला. त्यानंतर पोलीस नाईक वाव्हळे हे ऑटो रिक्षा ने त्याचा पाठलाग करीत भगवान बाबा चौकातील पेट्रोल पंपावर गाडी सीएनजी भरण्यासाठी उभारली. त्या युवकांना आपल्या वर कुणी नजर ठेवत असल्याचे कुणालाही जाणवले नाही. याची त्यांना थोडी कल्पना आली नाही. कार मधिल बसलेल्या युवकाकडे चौकशी केली यावेळी बाहेर असलेल्या तिघांनी तेथून पळून गेले. कार मधील एकास पकडल्यानंतर त्यांना पोलीस खाक्या दाखवताच तो नागपूरचा असल्याचे सांगितले व इतर साथीदार हे झारखंडचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एक मोबाईल बस स्थानकातुन चोरला असल्याचे सांगितले. कारची झडती घेतली असता आत मध्ये तब्बल ६३ मोबाईल आढळून आले. वाव्हळे यांनी मोबाईल व कार सह त्या चोरट्याला अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या कामगिरीमुळे तेजस वाव्हळे यांचे कौतुक होत आहे. हे मोबाईल ट्रेस होऊ नये म्हणून चोरट्याने त्याला चांदीचे आवरण गुंडाळले होते. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *