सोनिजवळा येथे म्हसोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – गोविंद ससाणे

केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी म्हसोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील सोनिजवळा येथील श्रीक्षेत्र म्हसोबा महाराज या देवस्थानाच्या यात्रेचे आयोजन मंगळवार दिनांक, 31 / 12 / 2024 ते 1/1/2025 रोजी, सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ससाणे च्या वतीने आयोजित केले आहे

यात्रेनिमित्त आयोजीत केलेले विविध कार्यक्रम दि 31, मंगळवार रोजी सकाळी ८ ते१०, वाजता देवाला पाणी घालणे, दुपारी 1. वाजता बारा गाड्या ओढणे, संध्याकाळी ७ वाजता शोभेची दारू उडवणे . तसेच संध्याकाळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी 8 ते11 वाजता होईल, त्यानंतर बुधवारी दुपारी 1 वाजता दिनांक 1 / 1/ 2025 रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम होईल, त्यांनंतर संध्याकाळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा
कार्यक्रम होईल तरी भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन‌ सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ससाणे यांनी केले आवाहन केले आहे

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *