भाटुंबा गावातील 25 तरुणांनी खडतर प्रयत्न करून मिळवली शासकीय नोकरी

केज! प्रतिनिधी 

केज तालुक्यातील भाटुंबा या गावच्या पंचवीस तरुण-तरुणींनी आपले कौशल्य पणाला लावून मेहनत करून अभ्यास करून शासकीय निमशासकीय केंद्रीय स्तरावरील नौकरी मिळवली आज अनेक युवकांना रोजगार नाही रोजगार नाही असं म्हणत असताना या तरुणांनी मागील सहा महिन्यात एकाच गावातील 25 तरुण-तरुणींनी नोकरी मिळाल्याचे पाहायला मिळाले व भाटुंबा या गावचे नाव मोठे केले गावातील माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे यांनी दिपावली च्या सणाच्या औचित्य साधून या सर्व युवक युवतींचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला‌ होता व यामध्ये या तरुणांचा सत्कार करून गावातील पुढील तरुणांसमोर कष्ट करण्याची व जिद्द बाळगण्याचे नवीन प्रेरणा दिले.

भाटुंबा गावातील नोकरी मिळालेल्या या भादर तरुण-तरुणींचे नावे पुढीलप्रमाणे लक्ष्मीकांत सुनील कापरे कृषी सहाय्यक रोहित रामकिसन धपाटे स्टाफ नर्स मुंबई परमेश्वर एकनाथ रणदिवे लाईनमन मीनाक्षी गोरख चौरे स्टाफ नर्स शितल महादेव चौरे स्टाफनर्स जागृती अंकुश धपाटे हर्षदा महादेव जोगदंड , वर्षा किरण चौरे अभियंता रामेश्वर राजेभाऊ रणदिवे युनियन बँक कर्मचारी क्रांती संभाजी करपे स्टाफ नर्स सुदर्शन मन्मथ तपसे आरोग्य सेवक सुजित पृथ्वीराज कापरे पोलीस प्रतीक्षा बन्सी जोगदंड , मालती बाळासाहेब जोगदंड स्टाफ नर्स तेजस्विनी धर्मराज जोगदंड अंगणवाडी सेविका अशोक प्रकाश राऊत आरोग्य विभाग सुहास संतोष चवरे निमशासकीय लुपिन कंपनी प्रोडक्शन आकाश दत्तात्रय धपाटे अजित अशोक चवरे इंजिनिअर प्रवीण वामनराव पाटील इलेक्ट्रिकल ऑपरेटर शुभांगी कुलदीप धपाटे समुदाय आरोग्य अधिकारी रेवती अमोल तारडे , प्रवीण मधुकर कापरे बँक ऑफिसर प्रदीप मधुकर कापरे लाईनमन असे विविध विभागातील कर्मचारी म्हणून कर्मचारी म्हणून या सर्वांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले गावचे नाव उंचावले म्हणून ज्ञानेश्वर चवरे यांनी या सर्व युवकांचा सत्कार करून एक नवा पायाडा पाडला व पाठीवर कौतुकाची थाप मारली यावेळी बबन लोमटे सुनील केंद्रे संजय चवरे सतीश मस्के सुंदर तपसे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होत .

माझ्या गावातील या बहाद्दर तरूण तरुणींने स्वताच्या मेहनतीने व जिद्दीने या खडतर प्रवास करत या पदा पर्यंत गवसणी घातली मला अभिमान वाटतो पुढच्या वर्षी या पेक्षा दुप्पट तरूण तरुणींचा सत्कार करण्याचा योग्य या आशी ईश्वरचरणी प्रार्थना यावेळी माजी सभापती तथा सरपंच पती ज्ञानेश्वर चवरे यांनी बोलाताना भावणा व्यक्त केल्या

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *