दोन दिवसांत डिपी (ट्रान्सफॉर्मर) दुरूस्त करून दिला नाही तर आंदोलन करणार – सरपंच पवार,पाथरा
तलाव उशाला अंन् कोरड घशाला
केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील पाथरा येथील डिपी (ट्रान्सफॉर्मर) जळाल्याने गावात गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांचे हाल होत आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील पाथरा येथील गावला पाणी पुरवठा करणारी डिपी (ट्रान्सफॉर्मर) गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खराब झाल्याने गावातील महीला भगिणीचे पाण्या वाचुन हाल होत आहे, विजवितरणचे आडमुठ्या धोरणामुळे पाथरा येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचा विचार करुन जळालेली डिपी (ट्रान्सफॉर्मर) बदलुन द्यावा आशी मागणी सरपंच पवार यांनी वारंवार करून देखील विजवितरणचे अभियंता यांनी पाथरा येथील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे या आडमुठ्या धोरणामुळे पाथरा येथील नागरिकांना पाण्यासाठी वेठीस धरले आहे सरपंच पवार यांनी स्वताच्या शेतातील पेरुची बाग वाळवली आणि शेतातील बोरचे पाणी गावासाठी पुरवठा केला परंतु त्याही बोरला होल्टेस कमी येत असल्याने तेही बोर चालत नसल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे जर येत्या दोन दिवसांत लाईट आॅफिस ने डिपी (ट्रान्सफॉर्मर) दुरुस्त करून दिला नाही तर लाईट आॅफिस च्या दारात लोकशाही मार्गाने तिवृ आंदोलन करण्यात येईल असे सरपंच पवार यांनी बोलताना सांगितले