मराठी पत्रकार परिषदेच्या 86 व्या वर्धापन दिनानिमित्त केज येथील पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

केज! प्रतिनिधी

मराठी पत्रकार परिषदेच्या 86 व्या वर्धापन दिनानिमित्त केज येथील पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी  करण्यात आली
मराठी पत्रकार परीषद ही सर्वात जुनी पत्रकार संघटना असुन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताच्या विविध योजना राबविण्यात येतात तसेच पत्रकारांच्या विविध समस्या स्तरावर समन्वय साधून सोडवणुक केली जाते.मराठी पत्रकार परिषदेच्या 86 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पत्रकारांची आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने केज येथील मराठी पत्रकार परीषद व सर्व विविध पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी 3 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय केज येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व तंत्रज्ञ यांनी पत्रकार बांधवांची सर्व तपासण्या करून घेतल्या यात रक्त तपासणी रक्तदाब, सी,बी,सी, के एफ टी,एच आय व्ही,याची तपासणी व निदान करण्यात आले या तपासण्याकामि रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले या वेळी केज येथील पत्रकार रामदास तपसे, हनुमंत भोसले, धनंजय कुलकर्णी, रमेश गुळभिले, दशरथ चवरे, नंदकुमार मोरे, अशोक सोनवणे,गौतम बचुटे, डॉ हनुमंत सौदागर, सुहास चिद्रवार, मजहर शेक,मुबशीर खतीब, दिनकर राऊत, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, श्रीराम तांदळे यांची आरोग्य तपासणी करण्यात आली

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *