लक्ष्मी नर्सिंग स्कुल येथे जागतिक एड्स दिन साजरा

केज ! प्रतिनिधी

एड्स दिना निमित्त सिद्धी विनायक सेवाभावी संस्था, बीड संचलित लक्ष्मी नर्सिंग स्कूल केज येथे जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.
दि.१ डिसेंबर हा जागतिक एड्स दीन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त सिद्धी विनायक सेवाभावी संस्था, बीड संचलित लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे संस्थापक अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे, प्राचार्य रवी पवार, संतोष गालफाडे, गौतम बचुटे, श्रीहरी चौरे, बंगर मॅडम, नम्रता गायके, लखेरा, सर्व स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी
पाहुणे रमाकांत मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्य क्षेत्रात नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम आणि मेहनत घेवुन यश संपादन करावे. त्यामुळे संस्थेचे आणि त्यांचे नाव उज्ज्वल होईल. तसेच या संस्थेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व स्टाफ तत्पर आहे. यावेळी प्राचार्य रवी पवार यांनी एचआयव्ही आणि एड्स याची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. तसेच यावेळी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांचे मनोगत व्यक्त केले.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *