गेली पस्तीस वर्षे कट्टा समर्थक राहीलेले ज्ञानेश्वर तात्या चवरे यांनी सोडली मुंदडा परीवाराची साथ

केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील भांटुबा येथील केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर तात्या चवरे यांनी मुंदडा परीवाराची साथ सोडली

जुने सहकारी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असुन मुंदडा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर पृथ्वीराज साठे यांना प्रचंड बळ मिळणार आहे ज्ञानेश्वर चौरे यांनी मुंदडा परिवारासोबत असलेल्या काळात अनेक माणसे आपल्या बोलण्याने जोडून मुंदडा परिवारासोबत एक चांगला काळ घालवला होता

केज पंचायत समितीचे माजी सभापती पंचायत समिती सभापती श्री ज्ञानेश्वर अण्णासाहेब चौरे हे तालुक्यातील चांगले राजकीय व्यक्तित्व असून मोठा जनसंपर्क असलेले ते नेते आहेत प्रत्येक गावात त्यांचा असलेला संपर्क ही त्यांची खूप मोठी जमयाची बाजू आहे ज्ञानेश्वर चौरे यांनी आपल्या पंचायत समिती सभापतीच्या काळात अतिशय चांगले काम केलेले होते एक तरुण पंचायत समिती सभापती म्हणून संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला होता मागील 35 वर्षाच्या काळात स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्यासोबत काम करताना प्रत्येक गावात आपल्या सोबत त्या गावातील चांगली माणसे जोडलेली होती मध्यंतरीच्या काळात नंदकिशोर मुंदडा यांच्यासोबत मतभेद झाले होते त्यामुळे लोकसभा पासून ज्ञानेश्वर चौरे हे नंदकिशोर मुंदडा यांच्यापासून दुरावले होते सध्या विधानसभा निवडणुका चालू असताना त्यांचा प्रवेश मोठा राजकीय भूकंप मानला जात असून यामुळे नंदकिशोर मुंदडा यांचे प्रचंड नुकसान होणार आहे तर पृथ्वीराज साठे यांचे बळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे याचा नक्कीच लाभ होणार आहे ज्ञानेश्वर चौरे यांनी आपण घेत असलेला निर्णय थोडा त्रासदायक नक्कीच आहे परंतु आपण आज प्रवेश करत आहोत खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे माझे जुने सहकारी आहेत आज ते मोठ्या पदावर असल्यामुळे मला आनंद आहे राजकीय विरोध असला तरी कधीही आमचे मतभेद झाले नाहीत आणि आम्ही एकत्रित काम करत असल्यामुळे आता नक्कीच आनंद होत आहे यावेळी बोलताना खासदार बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की ज्ञानेश्वर चवरे हे माझे जुने सहकारी आहेत व माझ्या परिवारातीलच आहेत ते नक्कीच माझ्या भावाप्रमाणेच राहतील यावेळी कल्याण तात्या शिंनगरे यांची आठवण त्यांनी काढली व जसे माझ्यासाठी कल्याण तात्या होते तसेच आता ज्ञानेश्वर तात्या राहतील आणि आता मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात असल्यामुळे मला सहकारी सांभाळायचे आहेत मला आता बाकी कसली अपेक्षा नाही असे बोलून हे सर्व माझे सहकारी माझा परिवार आहे या वेळी बोलताना सांगितले यावेळी ज्ञानेश्वर तात्या चवरे, विलास चवरे, सुनिल धपाटे, पप्पू धपाटे,नाना मोरे या सहा बर्याच कार्यकर्तेचा प्रवेश झाला

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *