तेलगाव व पात्रुड परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या व्यथा; नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

बीड! प्रतिनिधी

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तेलगाव व पात्रुड परिसरात खासदार बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून नुकसानीची परिस्थिती, त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या.शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि अपेक्षेने उभे केलेले पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची खासदार सोनवणे यांनी यावेळी माहिती घेतली.शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना योग्य मदत व नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भूमिका खासदार बजरंग सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केली.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *