केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनिजवळा
येथील राजमुद्रा गणेश मंडळ व मिनाज पटेल (सर)यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचा परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक सलोखा व बंधुभाव अधिक दृढ व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेशाच्या पूजनानंतर व महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक मिनाज पटेल (सर) व राजमुद्रा गणेश मंडळ सोनिजवळा यांच्या वतीने
करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व नागरिक, महिला व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
महाप्रसादाच्या वितरणासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व आयोजक योग्य ते नियोजन करत असून, भाविकांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. महाप्रसादाची वेळ दुपारी 4 ते 7 राहिल
