केज ! प्रतिनिधी
मांजरसुंभा महामार्गावरील उमरी टोल नाक्यावर स्थानिक चारचाकी वाहनांना टोलमुक्ती देण्याच्या प्रमुख मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली दि.१४ जुलै वार मंगळवारी सकाळी ११:३० वाजता स्थानिक वाहनधारकांना व शेतकऱ्यांना घेऊन उमरी टोलनाका येथे चक्का पाऊन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी HPM टोल कंपनीच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करुन टोल नाक्याच्या 20 कि.मी. क्षेत्रातील स्थानिक चार चाकी वाहनांना व शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना संपूर्णपणे टोल माफी देण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली कंपनीच्या अधिकार्यांसोबत आंदोलकांनी आक्रमकपणे चर्चा करत येत्या ८ दिवसात स्थानिक वाहनांना टोल माफी नाही दिल्यास यापेक्षा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष कुलदीप यांनी दिला यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे केज युवा तालुकाध्यक्ष अतुल गवळी ,केज शहराध्यक्ष फेरोजभाई पठाण ,अजय वाघमारे, बाबा देशमुख, पिनू गोरे ,सोनू सूर्यवंशी ,दादासाहेब गुंड, महेश मोरे आदि पदाधिकारी ,वाहनधारक,शेतकरी उपस्थित होते. मंडळाधिकारी श्री.ढाकणे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले .आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केज पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.टोलनाक्यावरील चक्काजाम आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.स्थानिक वाहनांना टोलमुक्त केल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही .उपस्थित आंदोलकांनी एकजुटीने निर्धार केला.

