केज ! प्रतिनिधी
बीड जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्यातील तब्बल ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांनी प्रशासकीय तसेच विनंती बदली प्रक्रिया अंतिम करत या बदल्या केल्या आहेत. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
या फेरबदलात केज पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप मांजरमे यांची युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. तर युसुफ वडगाव येथील मच्छिंद्रनाथ शेंडगे यांची माजलगाव पिंक पथक येथे बदली करण्यात आली आहे.
मच्छिंद्रनाथ शेंडगे हे युसुफ वडगाव येथे कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. दरम्यान नव्याने नियुक्त झालेले संदिप मांजरमे हे अनुभवी अधिकारी मानले जात असून त्यांनी केज या ठिकाणी प्रभावी कामगिरी बजावली आहे. युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर त्यांचा भर राहणार असल्याची चर्चा आहे.या बदल्यांमुळे युसुफ वडगाव पोलीस प्रशासनात नवचैतन्य निर्माण होऊन सामान्य नागरिक, पत्रकार,व्यापारी व सामाजिक क्षेत्रातून नव्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.
